रिलायन्स- फ्युचर व्यवहाराला सेबीची मंजुरी

नवी दिल्ली – फ्युचर समूहाने आपला बहुतांश भाग 24,713 कोटी रूपयाला रिलायन्स इंडस्ट्रीजला विकण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवहाराला बाजार नियंत्रक सेबीने परवानगी दिली आहे.

सर्व भागधारकांची मंजुरी आणि राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाचा हिरवा कंदील या व्यवहारासाठी आवश्‍यक असेल असे सेबीने सांगितले. मात्र राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारानी वेगवेगळ्या निवेदनात म्हटले आहे की, या व्यवहाराला हे प्रकरण ज्या न्यायालयाच्या कक्षेत आहे त्या न्यायालयाची मान्यता मिळणे गरजेचे आहे.

या व्यवहाराला अमेझॉन कंपनीने आव्हान दिलेले आहे. आम्ही आगामी काळातही न्यायालयीन पातळीवर आमची बाजू मांडणार असल्याचे ऍमेझॉन कंपनीच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.