मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये गुगललवर काही माहिती सर्च करण्यासाठी सांगितली आहे. खरं तर हे ट्विट भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यासाठी असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. मिटकरी यांनी ट्विटमध्ये कोणाचही नाव घेतलं नसलं तरी या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच सुरु आहे.
अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”गुगल वर “मंगळसुत्र चोर” असे सर्च केल्यावर मिळालेली माहिती फार रंजक आहे बघा.. गुगलला पण आता चोर मार्केट माहित झाले” असा टोला यावेळी मिटकरींनी लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून पडळकर हे राष्ट्रवादीच्या शरद पवारांवर वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे टीका करत आहेत त्यावरूनच मिटकरींनी नाव न घेता ही खिल्ली उडवल्याचे समजते.
गुगल वर “मंगळसुत्र चोर” असे सर्च केल्यावर मिळालेली माहिती फार रंजक आहे बघा.. गुगल ला पण आता चोर मार्केट माहित झाले😆#अध्यक्षमहोदयगुगलवरकायकारवाईकरणार
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 27, 2023
पडळकरांनी नेमकी काय टीका केली होती
शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले होते,”महाराष्ट्राचे तीन भाग करा. एक लवासा, एक बारामती आणि एक मगरपट्टा. मगरपट्ट्याचा मुख्यमंत्री जयंत पाटलांना करा. लवासाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळे तर बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवार यांना करा. मग या तिन्हीचा मिळून एकत्र देश करा. त्या देशाचा पंतप्रधान शरद पवार यांना करा” अशी टोलेबाजी पडळकरांनी केली होती.