पुसेगावात किराणा दुकान सील !

निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या 19 दुचाकी जप्त

पुसेगाव :  जिल्ह्यात मंगळवारपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाचे उल्लंघन केल्याबद्दल राजेश शहा यांचे किराणा दुकान पोलिसांनी सील केले. शहा यांच्याकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर विनाकारण फिरणाऱ्या 19 जणांची दुचाकी वाहने जप्त करण्यात आली, तर विनामास्क फिरणाऱ्या सहा नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

सपोनि चेतन मछले, फौजदार बाळासाहेब लोंढे, हवालदार सुरेश कंठे, इम्तियाज मुल्ला व तलाठी गणेश बोबडे यांनी ही कारवाई केली. गावातील छत्रपती शिवाजी चौकात पोलीस बंदोबस्त असून विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.