शिरूर (प्रतिनिधी) – शहरातील प्रीतम प्रकाशनगर, महादेवनगर, विठ्ठलनगर, जोशीवाडीमध्ये बाधित रुग्ण आढळल्याने ही उपनगरे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे. पाच किलोमीटरचा परिसर 14 दिवसांसाठी बफर क्षेत्र जाहीर केला आहे.
दिल्लीवरून मांडवगण फराटा येथे आलेल्या बाधिताच्या संपर्कातील शिरूरच्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. प्रीतम प्रकाशनगर येथे मुंबईवररून आलेल्या करोना संशयित मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शहरात (दि.29) मुंबईहून आलेल्या एकाला तर वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
प्रीतम प्रकाशनगर येथे मुंबईवरून आलेला एक बाधित आढळला आहे. त्याच्याबरोबर दोन, नातेवाइकांच्या घरातील चारजण, एक स्नेही, असे सात, तर महादेवनगर येथील मृत वृद्धेच्या संपर्कातील तीन, एका हॉस्पिटलमध्ये 9, असे 12 जण दोन्ही बाधितांच्या संपर्कात आले होते. या 21 जणांना शिरूर येथील कोविड सेंटर येथे आयसोलेशन क्वारंटाइन केले आहे.