निंबळकमधील सर्व रस्ते सील

नगर  -तालुक्‍यातील निंबळक यथे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ग्रामसुरक्षा समितीने गावात येणारे सर्व रस्ते 8 जून पर्यत बंद करण्यात आले आहेत. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने चौदा दिवस बंद असणार आहेत.

निंबळक येथे तीस वर्षीय माहिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला चेंबूर येथून आली होती. चेंबूरहून निंबळकला येत असताना त्रास होत असल्याने या महिलेला तिच्या पतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गावात करोनाबधित रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.