चिंबळी – करोनाच्या पार्श्वभूमीवर मोई ग्रामपंचायतीच्या पातळीवर घरोघरी जाऊन सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तर गावा बंद ठेवण्यात आले असून खबरदारीचे उपाय म्हणून चिखली, मोई, निघोजे, चिंबळी फाट्याकडे जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत.
तर मेडिकल व दुकाने सोडून गावातील ठेवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरपंच राहुल गवारी, शिवसेना उपतालुका किरण गवारी, आनंद गवारी, मारूती येळवंडे, देवीदास मेदनकर, संतोष गवारी, मोहन गवारी यांनी केले आहे.
तसेच गावात कोणीही विनाकारण फिरताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.