स्क्रॅप साहित्यातून प्रेशरप्लेट फिक्‍सचर मशिनमध्ये सुधारणा

नवीन मशिनमुळे वर्कशॉप विभागातील श्रम आणि वेळ होणार कमी

 

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कोथरुड डेपोच्या कर्मचाऱ्यांनी स्क्रॅप साहित्याचा उपयोग करून प्रेशरप्लेट फिक्‍सचर मशिनमध्ये सुधारणा केली आहे. या नवीन मशिनमुळे वर्कशॉप विभागातील श्रम आणि वेळ कमी होणार आहे.

हेल्पर राजेंद्र पायगुडे, क्‍लिनर आसिफ खान, हेल्पर ड्रायव्हर अब्दुल शेख या तीन कर्मचाऱ्यांनी मिळून जुन्या सीएनजी बससाठी आणि लेलॅन्ड बसेससाठी दोन हायड्रोलिक प्रेशरप्लेट फिक्‍सचर मशिन तयार केल्या आहेत. यापूर्वीच्या जुन्या मशिनवर दिवसाला 3 प्रेशरप्लेट तयार होत होत्या.

आता नवीन सुधारित हायड्रोलिक मशिनमुळे दिवसाला 10 ते 12 प्रेशरप्लेट तयार होत आहेत. यामुळे वर्कशॉप विभागातील कामकाजात कमी श्रम आणि कमी वेळेत जास्त रेडी युनिट तयार होणार असून, या सुधारित हायड्रोलिक मशिनमुळे महामंडळाची आर्थिक बचत झाली आहे.

कर्मचाऱ्यांनी टाकाऊतून टिकाऊची निर्मिती करून त्यांचा अनुभव आणि कल्पकतेतून उल्लेखनीय कामगिरी केल्याचे पीएमपीकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.