मुंबई – स्टेट बॅंकेने विविध कालावधीच्या ठेवीवरील व्याज दरात 0.40 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या व्याजावरील उत्पन्नाला कात्री लागली आहे. नवे व्याजदर बुधवारपासून लागू झाले आहेत.
या अगोदर 12 मे रोजी स्टेट बॅंकेने ठेवीवरील व्याज दरात कपात केली होती. 45 दिवसाच्या ठेवीवरील व्याजदर 3.30 टक्क्यावरून 2.90 टक्के करण्यात आला आहे. 180 दिवस ते 210 दिवसाच्या ठेवीवरील व्याजदर 4.80 टक्क्यावरून 4.40% करण्यात आला आहे. एक वर्ष ते 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवीवरील व्याजदर 5.50 टक्क्यावरून 5.10 टक्के करण्यात आला आहे.
पाच वर्ष ते दहा वर्ष कालावधीच्या ठेवीवरील व्याजदर 5.70 टक्क्यावरून 5.40 टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व कालावधीच्या व्याजदरातही 0.40 टक्क्यानी कपात करण्यात आली आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठ्या रकमेवरील व्याजदरातही अर्धा टक्क्यापर्यंत कपात करण्यात आली आहे. कर्जावरील व्याजदरात कपात करावी लागत असल्यामुळे ठेवीवरील व्याज दरातही कपात करावी लागत असल्याचे स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनिष कुमार यांनी सांगितले आहे.