Toll Rate Hike| भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल टॅक्स दरात वाढ करण्यात आली आहे. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. एप्रिलमध्ये ही वाढ करण्यात येणार होती. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया संपताच ही टोल दरवाढ लागू करण्यात आली.
देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर 3 ते 5 टक्के अधिक टोल आकारला जाणार आहे. याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारपासून म्हणजेच 3 जून 2024 पासून टोलचे दर 3 ते 5 टक्क्यांनी वाढवले जातील. वापरकर्ता टोल दरांमधील सुधारणा निवडणुकीदरम्यान पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आता निवडणूक प्रक्रिया संपली आहे, त्यामुळे हे दर आज 3 जूनपासून लागू होतील. त्यानुसार आता सोमवारपासून देशातील सुमारे 1,100 टोल प्लाझावर टोल दरात 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होईल. Toll Rate Hike|
मासिक पास बनवण्याचे दरही वाढले
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, टोलनाक्याच्या 20 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकांसाठी मासिक पास बनवण्याचे दरही वाढले आहेत. टोलनाक्याच्या 20 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकांना आता फास्ट टॅगसाठी दरमहा 10 रुपये अधिक द्यावे लागतील. तर महिन्याच्या फास्ट टॅगची किंमत आता 330 रुपयांऐवजी 340 रुपये असेल.
प्रवाशांवर आर्थिक भार
टोल टॅक्स हे काही आंतरराज्यीय द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग ओलांडताना चालकांना भरावे लागणारे शुल्क आहे. हे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत येतात. मात्र, दुचाकी चालकांना टोल भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. विरोधी पक्ष आणि अनेक वाहनधारक टोलच्या दरात वाढ होण्याला विरोध करतात, कारण त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च वाढतो आणि प्रवाशांवर आर्थिक भार पडतो. Toll Rate Hike|
हेही वाचा :
Virat Kohli : रनमशीन कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ICC कडून मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार