व्हिएतनाममधील शाळा उघडणार 

हनोई(व्हिएतनाम): व्हिएतनाममध्ये गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आता पुन्हा सुरू व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे देशभरातील विद्यार्थी आता शाळांकडे परतायला लागले आहेत. देशभरातील करोना विषाणूचे संकट ओसरलेले असले तरी अजून पूर्ण संपलेले नाही. त्यामुळे शाळेमध्ये एकत्र येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मास्क आणि अन्य उपाय योजनांची मोठ्या प्रमाणावर आवश्‍यकता आहे. यावेळी प्रतिबंधात्मक उपाय लागू करणे फार महत्वाचे आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हात निर्जंतुक करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायजर उपलब्ध करून दिले गेले आहेत.

शाळांच्या प्रवेशद्वारापाशीच विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आणि ते जेंव्हा वर्गात जाऊन बसतात, तेंव्हा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातील नोंदी करून ठेवल्या जातात, असे शाळेतील शिक्षिका डिन्ह बिच हाईन यांनी सांगितले. व्हिएतनाममध्ये कोविड-19 चे एकूण 271 रुग्ण आहेत. जवळपास तीन आठवड्यांनंतर तिथे नवीन रुग्ण सापडला आहे.

देशातील पहिला रुग्ण फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सापडला होता, तेंव्हापासून गेल्या 3 महिन्यांच्या काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या काळात शालेय अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवला जात होता. मागील महिन्यात, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व्हिएतनाममध्ये प्रवासी निर्बंध घातले गेले आणि तीन आठवड्यांसाठी सर्व व्यवसाय बंद केले गेले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.