शाळांना संचमान्यता दुरूस्तीसाठी सवलत द्यावी

 महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची मागणी

पुणे(प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात दरवर्षी होणाऱ्या संचमान्यता होणार नसल्याचे जाहीर केले होते. यामुळे राज्यातील अनेक शाळांकडून विद्यार्थी पटसंख्या ऑनलाईन भरली गेली नाही, परिणामी या शाळांची ऑनलाईन पटसंख्या कमी दिसत असून विनाकारण शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्‍यता दाट असल्याने संचमान्यता ऑफलाईन किंवा ऑनलाईन दुरूस्तीकरिता सर्व शाळांना सवलत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी व प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक सुनील जगताप, पुणे जिल्हा माध्यमिकचे अध्यक्ष रवींद्र वाघ, प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष एकनाथ आंबले, जिल्हा सरचिटणीस रणजीत बोत्रे यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची भेट घेऊन संच मान्यता होणार नसल्याने शिक्षकांच्या निर्माण होणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

राज्यातील अनेक शाळांकडून इयत्ता पहिली, इयत्ता पाचवीची विद्यार्थी पटसंख्या ऑनलाईन भरली गेली नाही. यामुळे या शाळांची ऑनलाईन पटसंख्या कमी दिसत असून विनाकारण शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्‍यता दाट शक्‍यता निर्माण झाली आहे त्यामुळे संच मान्यता ऑनलाईन किंवा ऑफलाईन करून घेणे गरजेचे आहे. करोना महामारीच्या काळामध्ये हे शक्‍य नसल्यास मुख्याध्यापकांचे पत्र ग्राह्य धरून पटसंख्या आणि संच मान्यता निश्‍चित करावी, असा आग्रह शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आल्याचे सुनील जगताप यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.