युरोपातील शाळा, महाविद्यालये होणार सुरू

 

लंडन : करोनाच्या भीतीमुळे गेल्या महिन्याभरापासून बंद असलेल्या संपूर्ण युरोपातील शिक्षण संस्था पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. डेन्मार्क, इटली, ब्रिटन आणि ऑस्ट्रीयासारख्या देशांमधील करोना बाधितांच्या नव्या रुग्णांची संख्या गेल्या महिन्याभरापेक्षा तुलनेने घटायला लागल्याने आता शाळा, कॉलेज पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मात्र काही तज्ञांनी शाळा, कॉलेज तातडीने सुरू न करण्याबाबत खबरदारीचा इशारा दिला आहे. या देशांमध्ये करोनाचा उद्रेक सर्वाधिक प्रमाणात झाल्याने आता हे प्रमाण कमी होण्याची चिन्हे दिसायला लागली आहे. पण तरिही नव्याने प्रादुर्भावाची शक्‍यता नाकारता येत नाही, असे या तज्ञांनी म्हटले आहे. पॅरिस, मिलान आणि मद्रिद येथील रुग्णालय कर्मचाऱ्यांवर गेल्या काही आठवड्यांपासून अतिरिक्‍त कामाचा प्रचंड ताण आला आहे. इथल्या रुग्णालयांमध्ये नव्या रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. स्पेनमध्ये तर हॉस्पिटलच्या कॉरिडोरमध्येही रुग्णांना जागा करून देण्यात आली होती. मात्र आता नव्याने रुग्ण उघड होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
जगभर मरण पावलेल्या दिड लाख जणांपैकी एकतृतीयांश रुग्ण युरोपियन संघ आणि ब्रिटनमधील आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या कठोर निर्बंधांनंतर आता युरोपातील प्रादुर्भाव कमी होत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.