Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांची अपघातात अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यातच या दुःखद बातमीने महाराष्ट्र हादरला आहे. संपूर्ण बारामती सुन्न झाली असून मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. अनेक राजकीय मंडळींना अश्रु अनावर झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली असून, अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र सुन्न झाला आहे.(Ajit Pawar ) अनेक ठिकाणी गावे, मार्केट यार्ड बाजारपेठा बंद असून शिक्षण संस्था आणि शाळा महाविद्यालय बंद आहेत. यासोबतच अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बारामती बंद करण्यात आली आहे. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला आहे. हे देखील वाचा : Ajit Pawar Death : ‘महाराष्ट्राला, बारामतीला अजूनही तुमची गरज होती…’; अजित पवारांच्या निधनानंतर चंद्रकांत पाटलांकडून दु:ख व्यक्त अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रूग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा आक्रोश केला असून कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी सध्या बघायला मिळत आहे. पुणे शहरात देखील शोककळा पसरलेली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या आदेशानुसार आज आणि उद्या शहर बंद ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. दरम्यान, उद्या शहरातील मार्केटयार्ड पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येत असून परिस्थितीवर प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे.