शाळकरी विद्यार्थिनीने अपहरणाचा प्रयत्न उधळला; वार झाल्याने जखमी

युवकांशी दोन हात करुन घेतली सुटका; वार केल्याने विद्यार्थिनी जखमी

ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील एका गावातीलल अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांशी दोन हात करीत विद्यार्थिनीने आपली सुटका करुन घेतली. तिने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या झटापटीत तिच्या दोन्ही हातांवर वार झाल्याने मोठी दुखापत झाली आहे.

ही विद्यार्थिनी सकाळी साडेआठ वाजता शाळेत जाताना शाळेपासून ५०० मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला तोंडाला मास्क घालून आलेल्या दोन युवकांनी तिला ओढयामध्ये नेण्याचा प्रयत्न करत मुलीवर धारधार शस्त्राने वार करून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मुलीने त्या युवकाशी दोन हात करून त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.

जवळच असलेल्या ऊसतोड कामगाराच्या झोपड्यांकडे धाव घेतली व त्यांच्या मदतीने आपल्या आईवडिलांना फोन करून घडलेली घटना सांगितली. जखमी झालेल्या मुलीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्या अज्ञात व्यक्तीमध्ये झटापट झाल्याने त्या विद्यार्थिनीच्या दोन्ही तळहातावर वार होऊन गंभीर दुखापत झाली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.