ट्रॅक्टरखाली चेंगरून शाळकरी मुलगा ठार

सोलापूर – शहरातील स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावरील ट्रॅक्‍टरच्या खाली चेंगरून एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूर शहरातील दत्त चौकात घडली.

समर्थ धोंडीबा भास्कर (वय 13, उत्तर कसबा, पंजाब तालीम, सोलापूर) असे ट्रॅक्‍टरखाली चेंगरून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेतून विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे.

दत्त चौक परिसरातील काम सुरू असताना ट्रॅक्‍टरखाली चिरडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या अपघाताची नोंद करण्यत आली असून पुढील तपास सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.