6वी आणि 8वीच्या विद्यार्थ्याने बनवलेली इलेक्ट्रिक गाडी पाहून तुम्हीही कराल कौतुक…, पाहा व्हिडीओ

वाडा (पुुणे) – ऑनलाइन शिक्षणामुळे यंदा विद्यार्थी घरीच होते. त्यामुळे या वेळेचा सदोपयोग करीत वाडा (ता. खेड) येथील सख्या भावांनी दोन जण बसतील आणि पर्यावरणपूरक स्वयं:चलीत गाडी बनवून आपल्या कौशल्याची चुणुक दाखवली. त्यांनी बनविलेली गाडी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.

रयत शिक्षण संस्थेच्या, कर्मविर भाऊराव पाटील विद्यालय आणि अ‍ॅड. राम जनार्दन कांडगे ज्यू. कॉलेजमधील इयत्ता 8वीतील प्रणय पोपट तनपुरे आणि इयत्ता 6वीतील सोहम पोपट तनपुरे या दोघा भावांनी ही गाडी बनवली आहे. या गाडीचा उपयोग विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा, शेती काम, घरगुती वाहतुकीसाठी वापर करणे शक्य आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगुन नवनवीन प्रयोग करून ते यशस्वी करण्यात तनपुरे बंधू यशस्वी झाले आहेत. यातूनच देशाचे भावी वैज्ञानिक तयार होतील त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थान आर्थिक पाठबळ आणि योग्य मार्गदर्शन उच्च पातळीवर मिळणे आवश्यक आहे.

गाडी बनवण्यासाठी बॅटरी आणि मोटर वापरून 30 हजार रूपये खर्च करून स्वयं:चलीत गाडी बनवली आहे. या गाडीत 2 व्यक्ती बसून प्रवास करू शकतात. एकदा बॅटरी पूर्ण क्षमतेने चार्ज झाल्यावर गाडी 30 ते 50 कि.मी. अंतर कापते. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण नाही तर घरच्या घरी चार्ज करून गाडी वापरता येते. गाडी चार्ज करण्यासाठी 6 ते 8 तास लागतात, असे तनपुरे बंधुनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.