अष्टदशसूत्रीप्रमाणे होणार शाळा रजिस्टर तपासणी

शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांची माहिती  
गुरूनाथ जाधव

सातारा – सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांची वार्षिक तपासणी यावर्षी अष्टदशसूत्रीचा अवलंब करून होणार आहे. या संपूर्ण माहितीचा शिक्षण उपसंचालकांकडून आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली. राजेश क्षीरसागर म्हणाले, जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या वार्षिक तपासणीत शाळेसंबंधी 63, शिक्षकासंबंधी 10 आणि विद्यार्थ्यांसंबंधी 7 रेकॉर्डस शाळांना अद्यावत ठेवावी लागणार आहेत. याच महिन्यात शाळांची तपासणी होणार आहे. दरवर्षी 65 रजिस्टरची तपासणी होते, परंतु यंदा मात्र 80 रजिस्टरची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी शिकवणी वर्ग वगळून करण्यात येणार आहे.

तपासणी अहवाल स्थळ प्रत, तपासणी अधिकारी शिक्षणाधिकारी कार्यालय आणि विभागीय शिक्षण उपसंचालक असा चार प्रतीत अहवाल करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. यामध्ये अहवालातील शिफारशी स्वयंस्पष्ट असाव्यात. वैशिष्ट्यपूर्ण बाबी व त्रुटी वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडणे आवश्‍यक आहे. शाळा तपासणीपूर्वी किंवा एक दिवस अगोदर शाळेत पूर्वकल्पना देणे आवश्‍यक आहे. शाळा तपासणी करताना अष्टदशसुत्रीचा अवलंब करण्यात येत आहे. शिक्षकांसंदर्भात पुढील बाबींची तपासणी होणार आहे. यामध्ये वार्षिक नियोजन, अभ्यासक्रम नियोजन व घटक नियोजन, मूल्यमापन नियोजन व रेकॉर्ड चाचणी-सत्र परीक्षा नियोजन, शिक्षक प्रशिक्षण अहवाल, शिक्षक विशेष फाईल, पाठ टाचण वही, अकारिक मूल्यमापन नियोजन, संकलित निकालपत्र यांची तपासणी करण्यात येईल. विद्यार्थी संदर्भात तपासणी करताना विद्यार्थी माहिती रजिस्टर, विद्यार्थी संचालिका, आरोग्य तपासणी कार्ड, गृहपाठ स्वाध्याय, प्रयोग वही, प्रकल्प उपक्रम प्रात्यक्षिक, परिपाठ वही, यांची तपासणी करण्यात येणार आहे.

शाळा तपासणीत जनरल रजिस्टर, विद्यार्थी हजेरी, शिक्षक हजेरी, डेड स्टॉक, पुस्तके व नकाशे नोंद रजिस्टर, ग्रंथालय साहित्य देवघेव रजिस्टर, दाखले फाईल व प्रवेशपत्र, शासन निर्णय परिपत्रक फाईल्स, कार्यालयीन आदेश फाईल, मुख्याध्यापक लॉग बुक, शेरे पुस्तक, अभिप्राय पुस्तिका, हालचाल रजिस्टर, शाळा तपासणी अहवाल फाईल, सूचना वही, शैक्षणिक साहित्य रजिस्टर, शिक्षक वैयक्तिक फाईल, विविध स्पर्धा, विविध उपक्रम नोंद रजिस्टर, किरकोळ दिर्घ रजा नोंद रजिस्टर, पदभार चार्ज देवघेव रजिस्टर, स्थावर मालमत्ता फाईल, शिक्षण-प्रशिक्षण रजिस्टर, शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर, शालेय पोषण आहार नोंदवही, मोफत गणवेश व साहित्य रजिस्टर, पगार पत्रक फाईल, आरोग्य तपासणी, वेतनत्तर अनुदान जमा खर्च व व्हाऊचर फाईल, लोकवर्गणी देणगी जमा खर्च फाईल, कर्मचारी सेवा पुस्तके व गोपनीय अभिलेख, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, पोषण आहार मानधन वाटप, विविध निधी संकलन व विनियोगाचा नोंदी, आवक-जावक बारनिशी, नमुना नं 32 कायम स्वरूपी साहित्याचे रजिस्टर, नमुना नं. 33 तात्पुरत्या साहित्याचे रजिस्टर, चाचणी परीक्षा अहवाल, कीर्द आखणी, शालेय व्यवस्थापन समिती सभा व इतिवृत्त, शालेय व्यवस्थापन व विकास समिती इतिवृत्त, पालक शिक्षक संघ इतिवृत्त, परिवहन समिती सभा इतिवृत्त, तक्रार निवारण समिती रजिस्टर, पालक भेट रजिस्टर, शासकिय योजना लाभार्थी व पोहच रजिस्टर, शाळा बाह्या विद्यार्थी रजिस्टर, शाळा सिध्दी रजिस्टर, नियंत्रण समिती सभा इतिवृत्त, बांधकाम समिती, शाळा समिती, विशाखा समिती, माता पालक संघ रजिस्टर, सेवा हमी कायदान्वये दिलेल्या सेवा, पुस्तक पेढी योजना रजिस्टर, प्रयोग शाळा साहित्य रजिस्टर, स्काऊड- गाईड, एनसीसी, आरएसपी, संबंधित नोंदवही, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र फाईल, युडीआयएसई संबंधित फाईल, बिंदूनामावली व सेवा ज्येष्ठता यादी फाईल आदी रजिस्टर्सची काटेकोरपणे तपसणी करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.