वळण आश्रम शाळेत पौष्टिक खाद्य मेळावा 

file photo

राहुरी फॅक्‍टरी – येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळेत राष्ट्रीय पोषण मास आभियान अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राहुरी गट वळण, एकात्मिक आदीवासी प्रकल्प कार्यालय राजूर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,वळण व श्री गाडगे महाराज आश्रम शाळा वळण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पौष्टिक खाद्य महोत्सव उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाची सुरूवात सही पोषण, देश रोषण अशा घोषणा देवून बॅंड पथक, बॅंनरसह प्रभातफेरीने करण्यात आला. या फेरीत विद्यार्थी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. यावेळी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच बाबासाहेब खुळे, राहुरी पंचायत समितीच्या सभापती मनिषाताई ओहोळ, उपसभापती रवींद्र आढाव,जि. प. सदस्य महेश सुर्यवंशी, कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती दत्ताभाऊ खुळे, एकनाथ खुळे, दादा खुळे, महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती कल्हापुरे,सोनवणे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी शाळेतील विद्यार्थींनीनी सुंदर स्वच्छतेचा संदेश असणारे गाडगे बाबांचे गीत व स्वागत गीत गायले. यावेळी अंगणवाडी सेविका व शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत: बनविलेले पौष्टिक पदार्थांचे स्टॉंल लावले. त्या पदार्थांची शरीराच्या उर्जेसाठी असलेली आवश्‍यकता याची प्रात्यक्षिके नागरीक व विद्यार्थांना समजावून सांगितले.

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक मंगेश पगारे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमसाठी अंगणवाडी सेविका श्रीमती आढाव, दरंदले, खुळे, ठुबे आदींनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापक मंगेश पगारे यांनी प्रास्ताविक केले. प्रभाकरराव मकासरे यांनी सुत्रसंचलन केले. तर सुरेश पवार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)