सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ऐतिहासिक मालिका “पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत अहिल्या ही अगदी लहान वयातही एक असाधारण मुलगी कशी होती हे दाखविण्यात येत आहे.
या मालिकेत सध्या अभिनेत्री स्नेहलता वाशीकरला कास्ट करण्यात आले आहे. जी गौतमाबाई म्हणजे अहिल्या यांच्या सासूची भूमिका साकारत आहे. आपल्या शालेय जीवनाच्या आठवणीमुळे स्नेहलता ही भावुक झाली असून तिने आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.
शालेय जीवनाबाबत स्नेहलता वाशीकर म्हणाली, मला वाटते की शाळेचे ते दिवस हे आयुष्यातील सर्वात आनंदी आणि सुखी दिवस आहेत. ती प्रत्येकासाठी एक सुरुवात असते. शालेय जीवनच आपले चरित्र संपन्न करते आणि आपला मानसिक दृष्टिकोन निश्चित करत असतो, असे तिने सांगितले.