देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली मुख्याध्यापक, पालकांना अटक

बंगळुरू : कर्नाटकातील एका शाळेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि नाटक सादर करणाऱ्या मुलांच्या पालकांना अटक करण्यात आली. का कायद्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिमा हनन केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.

बिदर येथील पोलिस मुख्यालयात दोन महिला आणि शाहीन स्कूलच्या काही कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर दोन दिवसांनी ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांना न्यायलयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले. ते नाटक चौथी, पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले होते.

पोलिसांनी 26 जानेवारी रोजी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्याचबरोबर भारतीय दंड संहितेच्या काही कलमानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. ही फिर्याद सामाजिक कार्यकर्ते नीलेश राकश्‍याल यांनी नोंदवली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.