कटिहार – बिहारमधील कटिहार जिल्ह्यातून संतापजनक बातमी समोर आली आहे. शाळेतील एका मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य केले असून मुख्याध्यापकास गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे.
चौध्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या 12 वर्षीय मुलीसोबत मुख्यध्यापकाने विनयभंग करण्याचा प्रयत्न करत गालाचा चावा घेतला. यानंतर मुलीने आरडाओरड केली मुलीचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी शाळेच्या दिशेने धाव घेतल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यानंतर गावकऱ्यांनी मुख्याध्यापकास शाळेतील एका रुममध्ये बंद करुन ठेवले.
मुलीचे नातेवाईक आणि इतर ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी शाळेच्या बाहेर गर्दी केली. त्यानंतर थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस मुख्याध्यापकाला घेऊन जात असताना संतप्त ग्रामस्थांनी आरोपीवर हल्ला करत त्यास मारहाण केली. पोलिसांसमोर मुख्याध्यापकाला काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
पोलिसांनी याप्रकरणी मुक्याध्यापका विरुद्ध गुन्दा दाखल करुन घेतला आहे. हा गुन्हा पॉक्सो अंतर्गत दाखल केला असून अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान मानसिक त्रास होता आणि त्यातच चुकून हे कृत्य झाल्याचा दावा मुख्याध्यापकाने केला आहे.