शालेय क्रॉसकंट्री स्पर्धेत एक हजार खेळाडू सहभागी

पुणे – राज्य स्तरावर चमक दाखविणाऱ्या अनेक खेळाडूंसह एक हजार खेळाडू शिवरामपंत दामले स्मृतिचषक आंतरशालेय क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा आज गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.

महाराष्ट्रीय मंडळ व कटारिया प्रशाला यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी पुणे शहर व पुणे जिल्हा या दोन विभागात होणार आहे. त्यासाठी 11 वर्षाखालील (1 किलोमीटर), 13 वर्षाखालील (2 किलोमीटर), 15 वर्षाखालील (3 किलोमीटर) असे गट ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये 66 शाळांमधील 1078 खेळाडू सहभागी झाले आहेत.

त्यामध्ये एरिन नगरवाला प्रशाला, कटारिया प्रशाला, सेंट जोसेफ, एसपीएम, सिंहगड सिटी प्रशाला, रोझरी, डीईएस प्राथमिक, अंजुमन इस्लाम, भारतीय जैन संघटना, पवार पब्लिक स्कूल, तेंडुलकर क्रीडा निकेतन, रेणुका स्वरूप, वर्धमान प्रशाला, समता विद्यालय आदी शाळांनी भाग घेतला आहे. स्पर्धेसाठी एक लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचा प्रारंभ सकाळी 9 वाजता पुणे जिल्हा हौशी ऍथलेटिक्‍स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड व डॉ. शिरीष पाठक यांच्या हस्ते होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)