महाराष्ट्रीय मंडळातर्फे शालेय क्रॉसकंट्री स्पर्धा

पुणे – महाराष्ट्रीय मंडळातर्फे 25 जुलै रोजी शिवरामपंत दामले स्मृती आंतरशालेय क्रॉसकंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुणे शहर व पुणे ग्रामीण या दोन विभागात होणार आहे.

महाराष्ट्रीय मंडळ (मुकुंदनगर) येथे 25 जुलै रोजी सकाळी 7-30 वाजता या स्पर्धेस प्रारंभ होईल. स्पर्धेसाठी 11, 13 व 15 वर्षाखालील मुले व मुली असे गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेकरिता एक लाख रूपयांची बक्ष्रीसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेतील विविध वयोगटाकरिता 1 कि.मी, 2 कि.मी, 3 कि.मी या अंतराच्या शर्यती असतील. स्पर्धेचे हे आठवे वर्ष असून दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.