रांची – झारखंड राज्यातील सहा जिल्ह्यांमधील 15 शाळांमध्ये शिष्यवृत्तीसंदर्भात करण्यात आलेल्या एका पडताळणीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2019-20 मध्ये केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाद्वारे मंजुरी मिळालेल्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीबाबत 30 पेक्षा अधिक लाभार्थी विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण खुलासा केला आहे. यात मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.
रांचीच्या हुतूप येथील गॉड चर्च शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थी जिक्रूल अन्सारी म्हणाल, मे महिन्यांत 2,700 रुपये शिष्यवृत्ती मिळाली, जी प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या 5,700 रुपयांपेक्षा निम्म्याने कमी आहे. या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिष्यवृत्तीबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक उत्तर दिले.
गॉड चर्चच्या रेकॉर्डनुसार, 49 विद्यार्थ्यांना 1,000 रुपयांपासून 10,700 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. शाळेचे अध्यक्ष अनिल चकोर यांनी शाळेचे व्यवस्थापक आणि शिक्षकांवर यासंदर्भात फसवणुकीचा आरोप केला आहे. त्याचबरोबर तिलियाटांड, लातेहरच्या अली पब्लिक स्कूलमधील अथिया फिरदौस हिला सहावीच्या वर्गासाठी 10,700 रुपये मंजूर करण्यात आले.
खरतरं अथिया तिसरीच्या वर्गात शिकते आणि ती वसतिगृहातही राहत नाही. तरी देखील तिला शाळेतून 5,350 रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली, पण ती 1,000 रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र आहे, असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.