शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्टला

पुणे  – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 8 ऑगस्ट रोजी ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. 25 एप्रिल आणि 23 मे रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन होते.

मात्र, करोनामुळे दोन्हीही वेळी रद्द करण्यात आल्या. विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा घेण्याबाबतची मागणी होत होती. त्याची दखल घेण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन कल चाचणीही जाणून घेण्यात आली.

मात्र, बहुसंख्य शिक्षणाधिकाऱ्यांनी परीक्षा घेण्यास नकार दर्शविला होता. त्यांच्याकडून लेखी अभिप्रायही घेण्यात आले होते. याबाबतचा अहवाल तयार करून 9 जुलै रोजी परीक्षा परिषदेने शासनाला प्रस्ताव पाठविला होता. परीक्षा घेण्याबाबत काय करायचे याबाबत मार्गदर्शक सूचनाही मागवल्या होत्या.

अखेर करोनाच्या नियमांचे पालन करत ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेशही शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्‍त तथा अध्यक्षांना बजाविले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.