सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती जाहीर

उच्च शिक्षणासाठी 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची घोषणा

पुणे  – सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षणासाठी (पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम) 100 विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी आणि इतर शासकीय संस्थांशी संलग्नित विविध अभ्यासक्रमात 2020-2021 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. करोना संसर्गामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या “एज्यु-सोशियो कनेक्ट ऍण्ड सीएसआर इनिशिएटिव्ह’ अंतर्गत ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

 

 

 

सूर्यदत्ताच्या समितीमधील सदस्यांनी महाराष्ट्रातील विविध शहरात, जिल्ह्यात तसेच तालुकास्तरावर भेटी देऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. पंधरा दिवसांच्या या दौऱ्यात आलेल्या अनुभवावरून पोस्ट ग्रॅज्युएशन बरोबरच पदवीच्या (ग्रॅज्युएट) अभ्यासक्रमांसाठी देखील शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शिष्यवृत्ती यंदाच्या शैक्षणिक वर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी व इतर शासकीय संस्थांशी संलग्नित सूर्यदत्ता संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण ट्युशन शुल्क सूर्यदत्तातर्फे दिले जाईल. विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे पात्रता शुल्क व परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी व सर्व प्रक्रिया समजून घेण्यासाठी www.suryadatta.org या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.

 

 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पदवी अभ्यासक्रम…

बीएस्सी- सायबर अँड डिजिटल सायन्स, बीएस्सी एनिमेशन, बॅचलर ऑफ सायन्स इन हॉटेल मॅनेजमेंट, बीबीए, बीकॉम, बॅचलर ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ सायन्स इन फॅशन डिझाइन, एमएस्सी सीएस, एमकॉम, एमबीए, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेस, पीजीडीएम, एमजीए, बी-व्होक, मास्टर इन फाईन आर्टस.

 

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. एमएस्सी (संगणकशास्त्र), एमकॉम, एमबीए, पीजीडीएम आणि मास्टर इन फाइन आर्टस्, पदव्युत्तर डिप्लोमा (अर्धवेळ) हे सगळे अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख आहेत. त्यामुळे हे अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी चांगली नोकरी मिळवू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात.

– प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.