प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे – तंत्रशिक्षणच्या 6 व्यावसायिक अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षणाच्या 8 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अशा 14 परीक्षांचे (सीईटी) वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले. यात सर्वात महत्त्वाची मानली जाणारी म्हणजेच अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशासाठी अनिवार्य असणारी “एमएचटी-सीईटी’ 13 ते 17 एप्रिल आणि 20 ते 23 एप्रिल या कालावधीत दोन टप्प्यांत होत आहे.

राज्य सीईटी सेलची प्रवेश नियंत्रण प्राधिकरणासमावेत नुकतीच बैठक झाली. या बैठकीत उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. अभियांत्रिकी आणि फार्मसी, एमबीए, एमसीए, मास्टर ऑफ अर्किटेक्‍चर, पदवी व पदव्युत्तर हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी ही तंत्रनिकेतनची व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. तर उच्च शिक्षणाच्या तीन व पाच वर्षीय विधी अभ्यासक्रम (लॉ), बीपीएड, एमपीएड, बीएड, एमएड, बीए, बीएस्सी, बीएड इंटिग्रेटेड कोर्स ही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेल्या प्रवेश परीक्षांच्या संभाव्य तारखा देण्यात आल्या आहेत. राज्य सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे.

सीईटीच्या तारखा चार-महिने आधीच प्रसिद्ध केल्याने त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करणे शक्‍य होणार आहे. एवढेच नव्हे, परीक्षांसह कोणत्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, त्याची मुदत कधी संपेल, त्याचीही माहिती देण्यात आली.

निकालाची तारीखही जाहीर करण्यात आली. या सर्व तारखा संभाव्य आहेत. मात्र, यात काही बदल असतील, तर ते संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)