ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात बॅनक्रॉफ्टचा समावेश
लंडन – इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात सलामीवीर कॅमेरून बॅनक्रॉफ्टचा समावेश करण्यात आला आहे. एजबॅस्टन येथे एक ऑगस्टपासून पहिल्या कसोटीस प्रारंभ होणार आहे. यष्टीरक्षक टीम पायने याच्याकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व देण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेत फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करणारे डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांचा अपेक्षेप्रमाणे या संघात समावेश झाला आहे.
टीम पायने (यष्टीरक्षक व कर्णधार), कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, पॅट्रिक्स कमिन्स, मार्कोस हॅरिस, जोश हॅसेलवुड, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नुस लॅबुशाग्ने, नाथन लियॉन, मिचेल मार्श, मिचेल नेसर, जेम्स पॅटिसन, पीटर सिडल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यु वेड, डेव्हिड वॉर्नर.
ऍशेस कसोटी मालिका वेळापत्रक :
1 ते 5 ऑगस्ट- एजबॅस्टन – पहिली कसोटी
14 ते 18 ऑगस्ट-लॉर्डस येथे दुसरी कसोटी
22 ते 26 ऑगस्ट-हेडिंग्ले येथे तिसरी कसोटी
4 ते 8 सप्टेंबर-ओल्ड ट्रॅफर्ड येथे चौथी कसोटी
12 ते 16 सप्टेंबर-ओव्हल येथे पाचवी कसोटी