प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा “वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज

नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या वतीने “वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी 72व्या प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणाऱ्या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 15 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 32 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार आहे.

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्टे दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते.

वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रध्देविरोधात आवाज उठवत समाज प्रबोधनाचे महान कार्य केले आहे. हीच संतपरंपरा दर्शविणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुट उंचीची आसनस्थ मुर्ती खास आकर्षण आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.