जाशी येथे आढळले ‘खवल्या’ मांजर

पळशी (वार्ताहर) – जाशी (ता. माण) येथे रविवारी सकाळी एक खवल्या जातीचे दुर्मिळ मांजर आढळून आले. हे मांजर गेल्या दोन दिवसांपासून परिसरात दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

जाशी येथे गावच्या पश्‍चिम बाजुला गोंदवले रोडलगत पवारवस्ती (वाणकी) येथे दुर्मिळ असे खवल्या मांजर आढळून आले. ज्या भागात हे मांजर आढळून आले तो डोंगराळ परिसर असून या भागात नाला बांध व राणंद तलावातून येणारा कॅनॉल आहे. या परिसरातील शेती चांगली असल्याने याठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे. हे मांजर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.