शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थ्याची थेट सुप्रीम कोर्टात धाव, न्यायाधीश म्हणाले…

नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून देशभरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. करोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असून अनेक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा अध्यापही बंदच ठेवण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करण्यात याव्या यासाठी चक्क एका विद्यर्थ्याने थेट सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे.

अमर प्रेम प्रकाश (वय १२) असे याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो दिल्लीतील रहीवासी आहे. अमर आपल्या याचिकेत म्हणाला की, “गेल्या वर्षी मार्च-एप्रिलपासून शाळा बंद आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकदृष्ट्या परिणाम होत आहे. अनेक विद्यार्थी तणावग्रस्त बनले आहेत. ऑनलाईन सुरु असलेल्या वर्गांमुळे योग्य प्रकारे अभ्यास होत नाही.”

विद्यार्थ्याने केलेल्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी करण्यात आली आहे. यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने अभ्यासकडे लक्ष द्यावे असा सल्ला दिला आहे. तसेच शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेत असल्याचंही यावेळी कोर्टाने म्हटलं आहे.

देशभरातील शाळा उघडण्यात याव्यात यासाठी सुप्रीम कोर्टात दिल्लीतील एका विद्यार्थ्याने कोर्टात धाव घेतली होती. विद्यार्थ्याच्या या याचिकेची कोर्टान सुनावणी होती मात्र कोर्टाने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

न्या. डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, “विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन शिक्षण सुरु करण्यासाठी पुन्हा शाळा सुरु करण्याचे आदेश आम्ही देऊ शकत नाही. कारण नेमका धोका कुठे असेल हे आम्ही सांगू शकत नाही. कोणत्या जिल्ह्यात सध्या कोविडच्या घटना अधिक आहेत, हे ही आम्हाला माहिती नाही. मुलांनी आता पुन्हा शाळेत जायला हवं यात काही शंका नाही. पण हे राज्य सरकारांनी निश्चित करणं गरजेचं आहे. हा असा मुद्दा आहे ज्याची जबाबदारी राज्यांवर सोपवणं योग्य राहिल”

“आम्ही याला पब्लिसिटी स्टंट म्हणत नाही पण ज्या प्रकारचा दिलासा देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे, ती मागणी चुकीची आहे. कारण विविध राज्यांचे नियम वेगवेगळे आहेत. विद्यार्थ्यांना अशा प्रकारची याचिका दाखल करता कामा नये. सरकारं याबाबत जागृत आहेत” काही राज्यांनी यापूर्वीच शाळा सुरु केल्या आहेत. असेही न्या. चंद्रचूड म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.