एसबीआय लाइफची स्मार्ट फ्युचर चॉईसेस बचत योजना

– पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीत योजनेची विविध वैशिष्ट्ये निवडण्याचे अधिकार.
– प्रीमियमची रक्‍कम, पॉलिसीची मुदत व प्रीमियम भरण्याचा कालावधी निवडण्याचा पर्याय.
– मॅच्युरिटीची प्रतीक्षा न करता रोख बोनस किंवा डिफर कॅश बोनस निवडण्याचा पर्याय.
– विशेष मनी ऑन डिमांड या वैशिष्ट्यातून, विशिष्ट कालांतराने सर्व्हायव्हल बेनिफिट पे-आऊट मिळण्याची सुविधा.

खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने एसबीआय लाइफ-स्मार्ट फ्युचर चॉईसेस ही बचत योजना बाजारात आणली आहे. ग्राहकांची विम्याची वाढती गरज लक्षात घेऊन, ही वैयक्‍तिक स्वरूपाची, नॉन-लिंक्‍ड, पार्टिसिपंट आयुर्विमा बचत योजना सादर करण्यात आली असून, ग्राहकांना पॉलिसीच्या मुदतीत वेळोवेळी आपल्या बदलत्या गरजांनुरूप पॉलिसीतील विविध पर्याय व लाभ निवडण्याचे स्वातंत्र्य या योजनेंतर्गत मिळणार आहे.

आपल्या प्रीमियमची रक्‍कम किती असावी, पॉलिसीची मुदत किती हवी किंवा प्रीमियम भरण्याचा कालावधी किती असावा, याबाबतचे पर्याय ग्राहकांना एसबीआय लाइफ-स्मार्ट फ्युचर चॉईसेसमधून मिळणार आहेत. तसेच, आपल्या बदलत्या गरजा व आवश्‍यकतांनुसार आयुर्विमा योजनेतील विविध वैशिष्ट्यांचा आढावा घेण्याची क्षमता प्राप्त होणार आहे.

ग्राहकांच्या विकसित होणाऱ्या आवश्‍यकतांनुसार नियमित रोख बोनस आणि पेआऊट्‌स मिळू शकतील. या योजनेच्या तुमचे तुम्हीच करा या स्वरूपामुळे नव्या पिढीला ती आकर्षक वाटू शकेल. या नवीन पिढीला विमा योजनांच्या पूर्वी निवडलेल्या लाभांशी बांधिलकी नको असते, तर पॉलिसीच्या संपूर्ण काळात किंवा मॅच्युरिटीवेळी लाभ निवडण्याचे स्वातंत्र्य तिला हवे असते. त्यायोगे आयुर्विमा बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या या वैशिष्ट्यांचा लाभ घेण्याची या पिढीची आंतरिक गरज पूर्ण होते.

एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे झोन क्र. 1 चे प्रमुख रवी कृष्णमूर्ती म्हणाले, एसबीआय लाइफने नुकतेच एक आर्थिक शक्‍ती वाढविण्याबाबत ग्राहकांची मानसिकता समजून घेण्यसाठी सर्वेक्षण घेतले. आपण खरेदी केलेल्या उत्पादनांवर आपले नियंत्रण असावे, अशी आकांक्षा असणाऱ्यांसाठी ही नवी योजना आहे. आयुष्यात प्रगती होत जाईल, तशा गरजाही बदलत जातील. त्या अनुषंगाने या योजनेमध्ये काही वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ज्यांना निवडीचा हक्क हवा आहे, अशा ग्राहकांना स्मार्ट फ्युचर चॉईसेस आवडू शकते.

पॉलिसी घेतल्यापासून तिच्या पूर्ण कालावधीत ती आपल्या विविध गरजांनुसार बदलण्याची स्वायत्तता ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. यातून ग्राहक आपल्या भविष्यातील योजना प्रभावीपणे तयार करण्यास सक्षम होतील.

प्रमुख वैशिष्ट्ये
1) ही योजना क्‍लासिक चॉईस आणि फ्लेक्‍सी चॉईस या दोन लाभांसह उपलब्ध आहे.

2) क्‍लासिक चॉईस प्रकारात पॉलिसीच्या मुदतीच्या शेवटी एकरकमी विमाराशी मॅच्युरिटी लाभांसह मिळते आणि पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीत आयुर्विम्याचे कवच पुरविले जाते. फ्लेक्‍सी चॉईस या प्रकारात, सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणून मूळ विमाराशी नियमितपणे टप्प्याटप्प्याने दिली जाते. मुदतीच्या अखेरीस विम्याचे कवच समाप्त होत असताना मॅच्युरिटीचे लाभ दिले जातात.
अ) प्रीमियम भरण्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतरही एका पर्यायातून दुसऱ्या पर्यायाकडे वळण्याची सुविधा पॉलिसीधारकाला मिळू शकते.

3) रोख बोनस दरवर्षी घेण्याचा किंवा आपल्या पसंतीनुसार तो नंतर घेण्याचा पर्याय या योजनेमध्ये ग्राहकाला दिला जातो. हा बोनस कंपनीकडे एक मोठा निधी म्हणून जमा राहतो. पॉलिसीधारकाच्या मागणीनुसार, पॉलिसीच्या मुदतीत कोणत्याही टप्प्यावर, गरज भासेल तेव्हा ही बोनसची रक्‍कम त्याला मिळू शकते. बचत करून साठवलेल्या एखाद्या मोठ्या रकमेप्रमाणे हा बोनस त्यावेळी पॉलिसीधारकाच्या उपयोगी पडतो.
अ) नंतर घ्यावयाच्या पे-आऊटच्या रकमेवर तेवढ्या काळापुरते पॉलिसीधारकाला रिव्हर्स रेपोच्या दराने व्याज मिळू शकते.
ब) यातील ऑटो कव्हर या वैशिष्ट्यानुसार, पुढील प्रीमियम न भरण्याच्या परिस्थितीत, 2 वर्षे प्रीमियम भरलेले असल्यास 1 वर्षाचे आणि 5 वर्षे प्रीमियम भरलेले असल्यास 2 वर्षांचे अतिरिक्त विम्याचे कवच मिळू शकते.

4) ग्राहकाने लाभ हा पर्याय निवडला असल्यास, त्याला सर्व्हायव्हल बेनिफिट्‌स किंवा एकरकमी लाभ देण्याची व्यवस्था या योजनेमध्ये आहे.

5) मॅच्युरिटी बेनिफिट्‌स* : क्‍लासिक चॉईस प्रकारात प्रीमियम भरण्याचा कालावधी, ग्राहकाचे वय आणि त्याने निवडलेली पॉलिसीची मुदत यांच्या आधारे मॅच्युरिटीवर निश्‍चित विमा राशी (जास्तीत जास्त 138 टक्के) त्याला देण्यात येते. फ्लेक्‍सी चॉईस अंतर्गत, ग्राहकाला मॅच्युरिटी लाभ संपूर्णपणे, एकरकमी मिळू शकतात, पे-आऊट्‌सच्या पद्धतीने ते हप्त्यांमध्ये मिळू शकतात.

6) मागणीनुसार पैसे : यातील अनोख्या सुविधेनुसार,
अ) दरवर्षी रोख बोनस पे-आऊट घेण्याचा किंवा तो घेण्याचे लांबणीवर टाकून आवश्‍यक असेल तेव्हाच काढून घेण्याचा व उर्वरित रकमेवर व्याज कमावण्याचा पर्याय उपलब्ध.
ब) सर्व्हायव्हल बेनिफिट पे-आऊट लागू झाल्यावर तो काढून घेण्याचा किंवा तोदेखील घेण्याचे लांबणीवर टाकत आवश्‍यकतेनुसार काढण्याचा व त्याच्या उर्वरित रकमेवर व्याज कमावण्याचा पर्याय उपलब्ध.
प्रीमियम भरण्याचा कालावधी संपल्यावर 9 महिन्यांनी.
बोनससाठी पात्र झाल्यावर, म्हणजे, 2 वर्षे प्रीमियम भरल्यानंतर.

एसबीआय लाइफच्या स्मार्ट फ्युचर चॉईसेस’विषयी अधिक माहितीसाठ लिंक:

https://www.sbilife.co.in/en/individual-life-insurance/traditional/smart-future-choices

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.