मुंबई – जीवन विमा कंपन्यांपैकी एकएसबीआय लाइफ इन्शुरन्सने 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या कालावधीसाठी 26,256 कोटी रुचा नवीन व्यवसाय प्रीमियम नोंदवला. गेल्या वर्षी या तिमाहीत ही रक्कम 26,000 कोटी रुपये होती. नियमित प्रीमियममध्ये तिसर्या तिमाहीत 12% वाढ झाली आहे. तिसर्या तिमाहीत एसबीआय लाइफचा करपश्चात नफा 1,600 कोटी रु. इतका आहे.
एसबीआय लाइफच्या एयूएममध्ये 19% वाढ होऊन 31 डिसेंबर 2024 रोजी 4,41,678 कोटीरु.वर पोहोचली असून ती 31 डिसेंबर 2023 रोजी 3,71,410 कोटी रु.होती. कंपनीकडे देशभरात 1,086 कार्यालये असून, 309,590 प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचे विस्तृत वितरण नेटवर्क आहे.