SBIने करोडो ग्राहकांना दिला झटका; गृहकर्जदरात वाढ, जाणून घ्या आता किती आहे ‘दर’

नवी दिल्ली – स्टेट बॅंकेने आपला गृहकर्ज दर आता वाढवला आहे. हा दर आता 6.95 टक्के इतका झाला आहे. तो 1 एप्रिल पासून ग्राह्य मानला जाणार आहे. सध्या हा दर 6.70 टक्के इतका होता.

तथापि या सवलतीच्या दरात गृहकर्ज उपलब्ध करून देण्याची मुदत 31 मार्चला संपल्याने तो वाढवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले आहे.

31 मार्च पर्यंत जी सवलतीच्या दरात गृह कर्जे उपलब्ध होती त्यानुसार 75 लाखांपर्यंतच्या कर्जावर 6.70 टक्के इतक्‍या दराने तर 75 लाख ते 5 कोटी रूपयांच्या कर्जावर 6.75 टक्‍के दराने कर्जे दिली जात होती. आता 1 एप्रिल पासून हा व्याज दर 6.94 टक्के इतका करण्यात आला आहे.

स्टेट बॅंकेने गृहकर्जावरील व्याज दर वाढवल्यामुळे अन्यही बॅंका आपले व्याज दर नजिकच्या काळात वाढवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नवीन घरे घेणे आता ग्राहकांना महागात पडणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.