दिवाळीपूर्वीच SBI कडून ग्राहकांना मोठं गिफ्ट; गृह कर्जावर मिळणार सूट

नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी बॅंक असणाऱ्या भारतीय स्टेट बॅंकेने ग्राहकांना गृह कर्जावर व्याजदरात 0.25 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय
ग्राहकांना त्यांच्या सिव्हिल स्कोअर नुसार योनो द्वारे अर्ज केल्यानंतर 75 लाख रूपयांहून अधिक गृहकर्जावरील व्याजावर 0.25 टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. योनो हा बॅंकेचा डिजिटल कर्जाचा प्लॅटफाॅर्म आहे.

सणासुदीच्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना दिली भेट –
एसबीआयने बुधवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सणांच्या ऑफरचा एक भाग म्हणून 30 लाख रुपयांहून जास्त आणि 2 कोटी रूपयापर्यंतच्या गृहकर्जावर क्रेडिट स्कोअरच्या आधारे व्याज दरात 0.20 टक्के सवलत देण्यात येईल. यापूर्वी बॅंकेने 0.10 टक्के सूट जाहीर केली होती. ही योजना संपूर्ण देशभरासाठी असणार आहे.

योनोद्वारे अर्ज केल्यावर अतिरिक्त सूट-
ही सूट आठ महानगरांमध्ये तीन कोटी रूपयांपर्यंतच्या गृह कर्जावर देण्यात येणार आहे. ग्राहकांनी योनो प्लॅटफाॅर्मद्वारे कर्जासाठी अर्ज केल्यास, 0.05 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. बॅंक सध्या 30 लाख रूपयांपर्यंतचे गृहकर्ज 6.90 ट्क्के व्याजदरावर देत आहे. 30 लाख रूपयांपेक्षा जास्त गृह कर्जावरील व्याजदर सात टक्के आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.