एसबीआयच्या ग्राहकांना घर, गाडी खरेदी करणे होणार आणखी स्वस्त

नवी दिल्ली : येत्या 1 ऑगस्टपासून सरकारी बॅंक असणारी एसबीआय ऑनलाइन पैशांच्या व्यवहार सुविधांशी संबंधित शुल्क माफ करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जीएसटी काऊंसिलने घटवलेला कराचा दरही 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्यामुळे आता याचा फायदा एसबीआयच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

1 ऑगस्टपासून मालमत्तेसंबंधीचे सर्किल रेट कमी होणार आहे. तसेच नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घर खरेदी करणेदेखील आता आणखी स्वस्त होणार आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये घराचे रजिस्ट्रेशन करताना 6 टक्के कमी शुल्क द्यावे लागणार आहे. ग्रुप हाऊसिंगमध्ये 6 टक्के आणि कमर्शियलमध्ये 25 टक्के सरचार्ज संपवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच घरगुती सिलिंडरची किंमतही निश्‍चित केली जाणार असून, याचा सरळ प्रभाव आपल्यावर पडणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.