50 पैश्यांसाठी SBI ची ग्राहकाला नोटीस; कायदेशीर कारवाई करण्याचा उल्लेख

जयपूर: एकीकडे देशात विजय मल्ल्या, निरव मोदी यांच्यासारखे उद्योजक बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात धूम ठोकत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मात्र बँक धजावत नाहीत, पण ५० पैस्याची थकबाकी जमा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकाला नोटीस बजाली असल्याचा एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे.

तसेच जर हि थकबाकी जमा केली नाही तर कायदेशीर कारवी करण्यात येईल असेही या नोटिसीत म्हटले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधिशांनाही आश्चर्याचा धक्काच बसला आहे. जितेंद्र कुमार असे नोटिस बजावण्यात आलेल्या ग्राहकाचे नाव आहे.

जितेंद्र यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जनधन खाते आहे. या खात्यात 124 रुपये जमा देखील आहेत. तरी देखील बॅंकेने 12 डिसेंबरला रात्री 11 वाजता जितेंद्र यांच्या घरी एक नोटिस पाठवली. जितेंद्र कुमार यांच्याकडे 50 पैसे थकबाकी असून त्यांनी ती त्वरीत भरावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिसद्वारे देण्यात आला आहे.

‘खेतडी येथे शनिवारी लोकन्यायालय आहे. तिथे हजर होऊन थकबाकी असलेले 50 पैसे जमा करावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर नोटीस बजावण्यात आलेले ग्राहक जितेंद्र यांच्या ऐवजी त्यांचे वडील विनोद सिंह खेतडी येथील लोकन्यायालयात पोहोचले. जितेंद्र याना मणक्यांचा त्रास असल्याने ते येऊ शकले नाही, असे त्यांनी लोकन्यायालयात सांगितले.

विनोद सिंह यांनी सांगितले की, केवळ 50 पैशांसाठी बॅंकेने मुलाला नोटिस बजावली आहे. एवढेच नाही तर बॅंकेचे अधिकाऱ्यांनी तगादा लावला आहे. आता बॅंकेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याप्रमाणे अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे जितेंद्र यांचे वकील विक्रम सिंह यांनी सांगितले आहे. हे ऐकून लोकन्यायालयात उपस्थित असलेले बॅंक अधिकाऱ्यांने मात्र काढता पाय घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.