बारामतीत “एसबीआय चावडी’चा प्रारंभ

बारामती- व्यावसायिक क्षेत्रातील विविध घटकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्टेट बॅंक ऑफ इंडिया बारामती शाखेच्या वतीने “एसबीआय चावडी’ या दोन दिवसांच्या प्रदर्शनाचे गुरुवारी (दि. 14) उद्‌घाटन झाले. शुक्रवार (दि. 15) पर्यंत रेल्वे मैदानावर हे प्रदर्शन बारामतीकरांसाठी खुले असणार आहे. बांधकाम, चारचाकी वाहन विक्रेते, महिला बचत गट, यांना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती शाखा व्यवस्थापक राजेश कुमार साहु यांनी दिली.

एसबीआयचे उपसरव्यवस्थापक राजेंद्र नेहरा, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, पोलीस निरिक्षक औदुंबर पाटील यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. या प्रदर्शनात बारामती शहर पोलिस ठाण्याच्या वतीनेही सायबर गुन्ह्यांपासून कसा बचाव करायचा, कोणती काळजी घ्यायची. कोठे आपली फसवणूक होऊ शकते यबाबत सविस्तर माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे.

बॅंकीग प्रणालीविषयी जागरुकता निर्माण करण्यासह, नवीन योजनांची माहिती देणे व विविध व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाची अधिक वाढ होण्यासाठी प्रोत्साहन देणे असा या मागचा हेतू आहे. सामाजिक बांधिलकी जपत महिला बचत गटांच्या उत्पादनांची तसेच विविध व्यावसायिकांच्या व्यवसायाची तसेच उत्पादनांची माहिती लोकांना व्हावी, हा प्रदर्शनाचा हेतू असल्याचे साहू यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.