श्रीनगर – भारतीय स्टेट बँकेने (SBI) श्रीनगरच्या स्थानिक लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी तलावात तरंगणारे ATM सुरु केले आहे.
जगप्रसिद्ध दाल सरोवरात नौकांच्या आधारे हे ATM उभारण्यात आले आहे. या ATM मुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी प्रत्येकवेळी बँकेत जावे लागणार नाही.
स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश खरे यांच्या हस्ते या तरंगत्या ATM चे उद्घाटन करण्यात आले. हे ATM स्थानिकांची रोख रक्कमेची गरज पूर्ण करेल, अशी माहिती एसबीआयने ट्विटवरुन दिली.
SBI opened an ATM on a Houseboat at #DalLake, Srinagar for the convenience of locals & tourists. It was inaugurated by the Chairman, SBI, on 16th August. The #FloatingATM in the popular Dal Lake fulfills a long-standing need & will be an added attraction to the charm of Srinagar. pic.twitter.com/nz3iddHIdp
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 19, 2021
16 ऑगस्ट रोजी या ATM चे उद्घाटन करण्यात आले होते. दाल सरोवरातील हे तरंगणारे एटीएम सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.
यापूर्वी एसबीआय बँकेने 2004 मध्ये केरळमध्ये फ्लोटिंग एटीएम उभारले होते. झंकार या नौकेवर हे ATM उभारण्यात आले होते.