SBI अलर्ट ! ‘या’ 5 चुका करू नका, अन्यथा बॅंक खातं रिकामं होईल

नवी दिल्ली – ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वारंवार घडत असतात. बॅंकेतून बोलतोय म्हणत तुमच्याकडून ओटीपी, एटीएम पीन, सीव्हीव्ही किंवा युपीआय नंबर घेतला जातो आणि काही वेळातच तुमचं बॅंक खातं रिकामं होतं. त्यामुळे ग्राहकांची फसवणुक होऊ नये यासाठी बॅंकेने काही सुचना दिल्या आहेत. या सुचनांचे पालन करा आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवा.

एसबीआयने खालील 5 चुकांबाबत ग्राहकांना सावधान केले आहे.

1 कोणालाही तुमचा ओटीपी, पीन, सीव्हीव्ही आणि युपीआय देऊ नका-

जास्तप्रमाणात फसवणुकीचे प्रकार हे फोन काॅल द्व्हारे ओटीपी किंवा सीव्हीव्ही दिल्यामुळे झालेले आहेत. त्यामुळे बॅंक ट्रान्झॅक्शन करताना तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी, पीन, क्रेडिट-डेबिट कार्डवरील सीव्हीव्ही कोणालाही देऊ नका. जर तुम्ही असे केलेच तर बॅंकेशी त्वरीत संपर्क करा.

2 बॅंकेशी संबंधित माहिती शक्यतो फोनमध्ये सेव्ह करणे टाळा –

एसबीआयच्या म्हणण्यानुसार, तुमचा बॅंक खाते क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्ड नंबर फोनमध्ये सेव्ह करणे जोखमीचे आहे. डिजिटल चोरी करणारे याचा वापर करून तुमच्या खात्यावर डल्ला मारू शकतात.

3 एटीएम कार्डबाबती महिती शेअर करू नका –

तुमच्या एटीएम कार्डचा वापर शक्यतो स्वत: करा. एटीएम ची माहिती कुणाबरोबर शेअर करू नका. तुमच्या खात्याची माहिती लीक होण्याची शक्यता असते. तुमच्या परवानगीशिवाय खात्यातील पैशांमध्ये फेरफार होऊ शकतो.

4 बॅंकेकडून ही माहिती कधीही विचारली जात नाही –

युजर आयडी, पीन, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी, व्हीपीए याबाबतची माहिती बॅंकेकडून कधीही विचारली जात नाही. त्यामुळे अशी माहीती घेण्यासाठी जर तुम्हाला कोणाचा काॅल आला तर, त्यांना माहिती देऊ नका. तो नंबर ब्लाॅक करा.

5 पब्लिक डिव्हाइस, ओपन वायफाय द्वारे आर्थिक व्यवरहार करणे टाळा –

एसबीआयने सांगितल्यानुसार पब्लिक डिव्हाइस आणि ओपन वायफाय द्वारे आर्थिक व्यवहार करणे टाळा. कारण याद्वारे तुमची माहिती चोरली जाऊ शकते. तुमच्या खात्यातील पैसे परस्पर काढले जाऊ शकतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.