चंद्रपूर – ठाकरे सरकारने चंद्रपुर जिल्ह्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला होता. 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यासाठी दारूबंदी लागू केली होती. मात्र या दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्यानं राज्य सरकारने दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. दारूबंदी उठवल्यामुळे चंद्रपूरमधील बारमालक आणि मद्यप्रेमी भलतेच खूष झाल्याचं दिसत आहे.
दारूबंदी उठविण्याचा निर्णयाबाबत बोलतांना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते कि, जिल्ह्यात अवैध दारू मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुणवर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती.
मागील सरकारने दारू बंदी केली. मात्र अंमलबजावणी करू शकले नाही. तसेच आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून अवैध मार्गाने दारू येत होती. यामुळे समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले होते.
Maharashtra: Owner of a bar & restaurant in Chandrapur, performs ‘aarti’ of a photo of district’s Guardian Minister Vijay Wadettiwar, as the six-yr-old liquor ban here was lifted by state govt last week
He says, “For us he is God. Whoever helps us earn a livelihood, is our God.” pic.twitter.com/YikN32AEWb
— ANI (@ANI) July 10, 2021
यातच, एएनआय या वृत्त संस्थेने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार,’चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दारुविक्रेतासाठी देवचा. वडेट्टीवारांमुळेच, आमचा दारुविक्रीचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. जो तुम्हाला जगवतो, तोच खरा देव असतो, असे म्हणत या दारुविक्रेत्याने दारुबंदी उठविल्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोचे औक्षण करुन आरतीही केली.
दारुबंदी उठल्यानंतर चंद्रपुरात बारमालकाकडून पालकमंत्री विजय वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा, व्हिडीओ व्हायरल @VijayWadettiwar @BJP4Maharashtra @INCMaharashtra @NCPspeaks #म pic.twitter.com/TuIJr8tnQp
— Harish Malusare (@harish_malusare) July 9, 2021
दरम्यान, 8 जूनला दारूबंदी उठविण्याचा निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे, कोरोना कडक निर्बंध हटविल्यानंतर लवकर जिल्ह्यातील बंद झालेली दारूची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. यावरूनच चंद्रपुरातील एका दारुविक्री करणाऱ्या रेस्टॉरंट आणि बार मालकाने मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा-आरती केली आहे.