मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिकासह , सारा अली खान , श्रद्धा कपूर , रकूल प्रीत सिंग नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिकासह सारा अली खान , श्रद्धा कपूर आज चौकशी केली जात आहे.
I definitely #StandWithDeepika , she is not being questioned for her alleged involvement in drugs scandal. Why exactly she is being dragged into this shit, everyone knows.
— Aakib (@aakib_9594) September 26, 2020
यातच दीपिका चौकशीसाठी एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. पण त्याआधीच सोशल मीडियावर एक मोठा वर्ग दीपिकाच्या सपोर्टमध्ये समोर आला आहे. ट्विटरवर लोक #StandWithDeepika हा हॅशटॅग वापरून दीपिकाला सपोर्ट करत आहेत.
I am against godi media
So i #StandWithDeepika
— Gurpreet Garry Walia (@_garrywalia) September 26, 2020
दरम्यान, दीपिका जेएनयूच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी गेली होती म्हणून तिला या ड्रग केसमध्ये ओढलं जात आहे. जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेनंतर दीपिका पादुकोण प्रोटेस्ट करत असलेल्या स्टुडंट्सच्या सपोर्टमध्ये तिथे गेली होती.