‘स्पेशल २६’म्हणत नवाब मलिक म्हणाले आज पुन्हा नवा गौप्यस्फोट; अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याने पाठवले पत्र

मुंबई : आर्यन खान प्रकरणात रोज नवे आरोप -प्रत्यारोप होताना दिसत आहे. दरम्यान, या  प्रकरणाला आता वेगळे वळण मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सोमवारी आणखी काही आरोप केले.  त्यानंतर आज पुन्हा एकदा नवाब मलिक हे नवा खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, आज नेमका काय खुलासा मलिक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान त्यानंतर नवाब मलिक यांनी आज सकाळी एक ट्वीट केले असून यामुळे आता कोणते नवे आरोप आणि खुलासे होत आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. ‘SPECIAL 26’ असे  ट्वीट करत नवाब मलिक यांनी आपण लवकरच रिलीज करत आहे असे म्हटले आहे. त्यामुळे हे ‘स्पेशल २६’ म्हणजे नेमकं काय आहे पहावं लागणार आहे. नवाब मलिक यांनी यावेळी एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याने पत्र पाठवलं असून त्यातील माहिती समोर आणणार असल्याचेही सांगितले आहे.

यासोबतच नवाब मलिक यांनी सोमवारी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडेंवर निशाणा साधत एक उपहासात्मक ट्वीटदेखील केले आहे. “जब भी जी चाहे, नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे, लगा लेते हैं लोग”, ही गाण्याची ओळ टाकत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर टीका केली आहे. सोमवारी त्यांनी जन्मदाखल्याचा उल्लेख करत समीर वानखेडे यांनी बोगसगिरी करत नोकरी मिळवली असल्याचा दावा केला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.