बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप ही सततत कोणत्या न् कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. आलिया सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह असते आणि ती सतत आपले फोटो व व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते.
View this post on Instagram
आलिया कश्यपने आपल्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. या फोटोत आलिया आपला बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉयरसोबत दिसत आहे.
View this post on Instagram
या फोटोत दोघेही खूपच रोमॅंटिक मुडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. या फोटोसह तिने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ज्यात ते लिप लॉक करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत आलियाने पोस्ट लिहिली की,
View this post on Instagram
“माय लव्ह, तुला 22व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू मला जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे याची जाणीव करून दिली. मी भाग्यवान आहे की, मला तू भेटला. मी तुझ्यावर नेहमीच जीवापाड प्रेम करीत राहीन.
View this post on Instagram
दरम्यान, अनुराग कश्यप आणि आरती बजाज यांची आलिया ही मुलगी आहे. या दोघांनी 1997 मध्ये लग्न केले होते. परंतु 2009 मध्ये दोघेही विभक्त झाले. आलिया कश्यप बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या कोणतीही चर्चा नाही. मात्र, सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.