नवी दिल्ली- केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला 26 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली असून, आंदोलना दरम्यान केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची अनेक वेळा बैठक झाली. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नाही.
View this post on Instagram
त्यामुळे शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर ठिय्या मांडून आहेत. देशातील सामान्यांपासून ते सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यातच बॉलीवूडच्या भाईजाननेही इंस्टाग्रामवर खास फोटो शेअर करत या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
View this post on Instagram
सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने हातात फावडं घेतलं असून तो शेतात काम करताना दिसत आहे. शेती करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला ‘Mother earth’ असं कॅप्शनही त्याने दिले आहे. त्यामुळे त्याच्या या फोटोची चर्चा सुरु झाली आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर सलमानने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे की काय अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.
View this post on Instagram
पंजाबी कलाकार असो वा बॉलिवूड कलाकार सर्वच जण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री सोनम कपूर, दिग्दर्शक हंसला मेहता, दिलजीत दोसांज, सनी देओल, प्रियांका चोप्रा, प्रति झिंटा, या सर्वांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत आंदोलनावर भाष्य केलं आहे.