“मॅडम जी” म्हणत दिलजीतने कंगनाला दिले सडेतोड उत्तर

मुंबई – कंगना  राणावतचे नेहमीच ट्विटरवर  सक्रिय असते.  यातच तिने केलेल्या ट्विटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलनावर तिने केलेल्या टीकेमुळे कंगना रणौत आणि दिलजीत यांच्यातील ट्विटर वॉरने चांगलाच चर्चेत होता.

तर आता  पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना  राणावतने दिलजीत दोसांजवर शेतकरी आंदोलनाच्या मधेच परदेशात सुट्टी एन्जॉय करण्याचा आरोप लावला आहे. या आरोपामुळे पुन्हा एकदा ट्विटवर पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.

दिलजीतने नुकतेच सुट्टी एन्जॉय करतानाचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले होते. त्यावरून कंगनाने दिलजीतला ट्विट द्वारे खोचक टीका केली आहे की,”वाह माझ्या भावा! देशात आग लावून, शेतकऱ्यांना रस्त्यावर बसवून लोकल क्रांतिकारी परदेशात थंडीचा आनंद घेत आहे. वाह! याला म्हणतात लोकल क्रांतिकारी’. 

या टीकेवर दिलजीतने मिश्किल अंदाजात ट्विट करत उत्तर दिले आहे ‘मला हे समजत नाही की, हिला शेतकऱ्यांशी काय समस्या आहे? मॅडम जी, पूर्ण पंजाब शेतकऱ्यांसोबत आहे. तू ट्विटरवर जीवन जगत आहेस. तुम्हाला तर कुणी काही विचारतही नाहीये’.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.