‘मी सामना वाचत नाही’ म्हणत नाना पटोलेंनी लगावला शिवसेनेला टोला

मुंबई – सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष आणि संघटन टिकवीत असतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. प्रियंका गांधी शिकस्त करतील, पण कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे गरजेचे आहे.

काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल!  असा मजकूर असलेला लेख  शिवसेनेच मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेख  लिहिण्यात आला आहे.

काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचंय ?

आजच्या सामना अग्रलेखात  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देशभरातील काँग्रेस पक्ष, काँग्रेस  पक्षाचं डळमळीत झालेलं स्थान, काँग्रेस नेतृत्व यांवर राऊतांनी आजचा अग्रलेख लिहिला आहे.

याच अग्रलेखाबाबत  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना वृत्त वाहिन्यांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मी सामनावर कोणती प्रतिक्रिया देत नाही कारण मी सामना वाचत नाही. कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जातं असेल तर त्याचा विचार आम्हाला एकदा करावा लागेल” असं सूचक वक्तव्य केलं आहे. 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.