मुंबई – देशात कोरोना विषाणूमुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चालली आहे या काळात नागरिकांना प्रशासनाकडून घरी राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरी सुद्धा नागरिकांकडून सोशल डिस्टंसिन्गचा चांगलाच फज्जा उडतांना दिसत आहे. काही जण या नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस सातत्याने सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहेत. लॉक डाउनच काळात नियमांचं उल्लंघन होण्याच्या मुद्द्यावरून पोलिसांनी एक भन्नाट ट्विट केलं असून ते सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
Agdi barobar @DGPMaharashtra Police gharat surakshik, baher sadhya nahi #StayHome #StaySafe https://t.co/20z11Lpnep
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) May 26, 2020
“घर तुमचं, जमीन तुमची, मर्जी तुमची, पण बाहेर जाण्याची “परमिसन” आमची घ्यावी लागेल. तुमच्याच सुरक्षेसाठी. कोरोनाव्हायरस पासून सर्वात सुरक्षित ठिकाण आहे तुमची स्वतःची “हवेली”. विनाकारण बाहेर जाऊ नका, सुरक्षित राहा. #StayHome #StaySafe मात्र प्रशासनाने, पोलिसांनी वारंवार सूचना दे”,असं ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी केलं होतं. महाराष्ट्र पोलिसांचं हे ट्विट पाहिल्यानंतर आयुषमाननेदेखील लगेच ते रिट्विट करत “अगदी बरोबर. घरात सुरक्षित,बाहेर सध्या नाही”, असं मराठीत ट्विट केलं आहे.
दरम्यान, अलिकडेच महाराष्ट्र पोलिसांनी ‘गुलाबो सिताबो’ या आगामी चित्रपटाच्या टॅगलाइनचा अनोख्या पद्धतीने वापर करत नागरिकांना घरी राहण्याचं राहण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर अभिनेता आयुषमान खुरानानेदेखील मराठीमध्ये ट्विट करत नागरिकांना घरी राहण्यास सांगितलं आहे.