‘धन्य आहेत योगीजी मोदीजी…’म्हणत भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर मुलगा संतापला

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात यश आले नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे जीव जात आहेत. अनेक राज्यांमधील संसर्गाचे प्रमाण हे चिंता वाढवणारे आहे. मेडिकल ऑक्सिजन, ऑक्सिजन सिलेंडर्स यासाठी संघर्ष करणाऱ्या रुग्णालयांबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. मृतदेह मिळण्यासाठीही लोकांना कित्येक तास वाट पहावी लागत आहे. फक्त सर्वसामान्यच नाही. तर राजकीय नेतेही या परिस्थितीत हतबल झाले आहेत.

यातच मिळलेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशमधील बरेली येथील नवाबगंज मतदारसंघाचे भाजपाचे आमदार केसर सिंह गंगवार यांचा नुकताच करोनामुळे मृत्यू झाला. त्यांनी काही दिवसांपूर्वी नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात उपचार
करोनाचा संसर्ग झाल्यानंतर घेण्यास सुरुवात केली होती. मात्र रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांनी लिहिलेलं एक पत्र आता व्हायरल होत आहे.

तसेच केसर सिंह गंगवार यांच्या मृत्यू झाल्यानंतर मुलाने आता उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेविरुद्ध प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी म्हंटले आहे की,’ धन्य आहेत योगीजी आणि धन्य आहेत मोदीजी …उत्तर प्रदेश सरकारला त्यांच्या पक्षाच्या आमदारावरही नीट उपचार करता येत नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयाला अनेकदा फोन करुनही कोणी फोन उचलत नाही” असं केसर यांचा मुलगा विशाल याने  वृत्त माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.