पुणे, दि. 23 -सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा दि. 14 ते 18 डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यात दिग्गज कलाकार आणि त्यांचे शिष्यही आपली कला सादर करणार असून, सात कलाकार पहिल्यांदाच या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत. याशिवाय परदेशात स्थायिक झालेले परंतु आपली भारतीय संगीत परंपरा जपलेल्या कलाकारांचाही यंदा या महोत्सवातील सादरीकरणात सहभाग आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी याबाबत माहिती दिली. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मूळगुंद, पं. उपेंद्र भट, प्रभाकर देशपांडे आणि “पृथ्वी एडीफिस’चे अभय केले या वेळी उपस्थित होते. यानिमित्त देशाच्या विविध भागात वास्तव्याला असलेल्या किराणा घराण्याच्या गायकांचा विशेष सहभाग हे महोत्सवाचे वैशिष्ट्य असेल. तसेच महोत्सवाशी दीर्घकाळ संबंधित असलेले, मात्र नजीकच्या काळात स्वर्गवासी झालेल्या कलाकारांचे कुटुंबीय आणि शिष्यांना महोत्सवात सहभागी करून घेत, मंडळ त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहणार असल्याचे जोशी म्हणाले.
महोत्सवाची वेळ
दि. 14, 15 आणि 16 डिसेंबर – सायंकाळी 4 ते रात्री 10
दि.17 डिसेंबर – दुपारी 3 वाजता (पोलीस आणि सरकारची परवानगी मिळाल्यास रात्री 12 पर्यंत अन्यथा 10 वाजेपर्यंत)
दि. 18 डिसेंबर – दुपारी 12 ते रात्री 10
महोत्सवाचे ठिकाण : महाराष्ट्रीय मंडळाचे मैदान, मुकुंदनगर
दि. 14 डिसेंबर ः महोत्सवाची सुरूवात भीमसेनजींचे शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शाश्वती मंडल, जसराज यांचे भाचे आणि शिष्य पं. रतनमोहन शर्मा याचे गायन. वादन – सरोदवादक पद्मविभूषण अमजद अली खॉं
दि. 15 डिसेंबर ः गायन – किराणा घराण्याचे गायक अविनाश कुमार, पं. साजन मिश्रा आणि त्यांचे पुत्र स्वरांश मिश्रा. वादन – सरोदवादक उस्ताद अली अकबर खॉं यांचे पुत्र आलम खॉं, सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक एन. राजम, त्यांच्या कन्या संगीता शंकर आणि नाती रागिणी आणि नंदिनी शंकर
दि. 16 डिसेंबर ः गायन – किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस, पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी, पं. अजॉय चक्रबर्ती वादन – पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र, राहुल शर्मा
दि. 17 डिसेंबर ः गायन – जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका पद्मा तळवलकर यांच्या शिष्या असलेल्या यशस्वी सरपोतदार, धृपदगायक उमाकांत गुंदेचा आणि अनंत गुंदेचा यांचे सहगायन, भारती प्रताप, पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज, गायक, संगीतकार सिड श्रीराम यांचे कर्नाटक शास्त्रीय गायन जुगलबंदी – ख्यालगायक उस्ताद रशीद खॉं आणि सतारवादक उस्ताद शाहीद परवेज यांची जुगलबंदी
दि. 18 डिसेंबर ः गायन – पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे, गायक राजेंद्र कंदलगावकर जुगलबंदी – गायक महेश काळे आणि अमेरिकेतील संदीप नारायण यांच्या हिंदुस्थानी- कर्नाटक संगीत जुगलबंदी वादन – ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना. नृत्य – कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांचा नृत्याविष्कार समारोप गायन
– डॉ. प्रभा अत्रे